योगी आदित्यनाथ यांना ट्विंकल खन्नाचा सल्ला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2017, 02:33 PM IST
योगी आदित्यनाथ यांना ट्विंकल खन्नाचा सल्ला title=

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे. ट्विंकल खन्ना पुन्हा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे .

ट्विंकलने योगी आदित्यनाथ यांना सल्ला देताना म्हटलं आहे, योगी आदित्यनाथ यांनी असं योगासन करावं, ज्यामुळे गॅस रिलीज करण्यासाठी मदत होईल, ते व्यवस्थेसाठी चांगलं राहिल.

ट्विंकलने योगी आदित्यनाथ यांच्या फॅशन बाबतीतही वक्तव्य केलं. योगी आदित्यनाथ सध्या फॅशन बदलत आहेत. एशियन पेंटने आता नव्या सीझनसाठी ‘भगवाच नवा ब्राऊन कलर असेल’ ही टॅग लाईन ठेवावी, असं ट्वीट ट्विंकलने केलं.