मुंबई : मुंबईच्या टिळकनगर येथे पोलिसांनी एका कारमधून दोन गोण्या भरून पैसे जप्त केले आहे.
MH14DJ0707 या गाडीतून नाका बंदी दरम्यान पैसे सापडले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता, ही कॅश एकूण १० कोटी १० लाख रुपयांची असून या गाडीसोबत असलेल्या व्यक्तींनी दावा केला की, रक्कम वैजनाथ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेची आहे.
या दाव्याची चौकशी पोलीस करत असून या संदर्भात त्यांनी आयकर खात्याची मदत मागितली आहे.