सत्ता-संपत्ती-साधनांना हरवत शिवसेनेचा विजय : उद्धव ठाकरे

महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये टक्कर झाली. शिवसेनेने भाजपला विजयानंतरही टोकले आहे. सत्ता, संपत्ती, साधनांच्या जोरावर ताकद लावली गेली. मात्र, शिवसेनेला कोणीही रोखून शकत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2017, 07:43 PM IST
सत्ता-संपत्ती-साधनांना हरवत शिवसेनेचा विजय : उद्धव ठाकरे title=

मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये टक्कर झाली. शिवसेनेने भाजपला विजयानंतरही टोकले आहे. सत्ता, संपत्ती, साधनांच्या जोरावर ताकद लावली गेली. मात्र, शिवसेनेला कोणीही रोखून शकत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला. 

शिवसेनेच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांचे आभार मानले. या यशासाठी मराठी माता-भगिनींचे लाख लाख आभार मानतो, मात्र अन्य भाषिकांनी देखील आम्हाला मते दिली आहेत. मी जे करतो ते थेट करतो त्यामुळे पुढे काय निर्णय घेणार तो काही दिवसात तुमच्यासमोर मांडेल, असं ते म्हणालेत.

मुंबईत आम्हाला चांगल यश मिळालं आहे, शिवसेनेची कामगिरी चांगली झाली. गेल्यावेळेपेक्षा आता आमच्या जास्त जागा आल्या आहेत. काही जागा आम्ही अगदी थोड्या फरकाने हरलो आहोत. मात्र समोर सत्ता-संपत्ती आणि साधन प्रचंड प्रमाणावर वापरून देखील त्यांना पाहिजे तितक्या जागा मिळवता आल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, यंदा मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं मतदार याद्यांमधून गायब झाली. कोणत्याही मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावून घेणं हे चुकीचे  आहे. मतदार याद्यांचा हा घोळ म्हणजे एकप्रकारचे षडयंत्र आहे. त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव यांनी यावेळी केली.