मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या व्यापा-यांच्या संपामुळे भाज्यांचे भाव आकाशाला भिडलेत. यामुळे भाजी खावी की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. महागाईच्या दिवसांतच भाज्यांच्या चढत्या दरांमुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला जबरदस्त कात्री लागत आहे.
ठाण्यात सध्या भाज्यांनी दिडशेचा पल्ला पार केला आहे. त्यामुळे जगण्यासाठी खायचं तरी काय असा प्रश्न, सामान्य विचारत आहेत.
ठाणे, मुंबईत कडाडलेल्या भाज्यांचे दर
१) फरस बी - १६० रु किलो
२) शिमला मिरची - १६० रु किलो
३) तोंडली - १६० रु किलो
४) वटाणा - १६० रु किलो
५ ) पडवळ - १६० रु किलो
६) कोबी - १६० रु किलो
७ ) गवार - १६० रु किलो
८) भेंडी - १२० रु किलो
९) वां गी - १२० रु किलो
१०) शिरली - १२० रु किलो
११) फ्लॉवर - १२० रु किलो
१२) शेंगा - १२० रु किलो