मुंबई : कामगार चळवळीतील ज्येष्ठ गोदी कामगार नेते श्रीकृष्ण रामचंद्र उर्फ एस. आर. कुलकर्णी यांचं वृध्दापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते.
दादरच्या राहत्या घरी त्यांनी सोमवारी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव कर्नाकबंदर येथील पी. डिमेलो भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साडे तीन वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी ते 60 वर्ष होते. एस. आर. कुलकर्णी यांनी भारतीय बंदर आणि गोदी कामगार महासंघाचे अध्यक्षपदही भूषवलंय. स्वातंत्र्यपूर्वी काळात गोदीतील कामगारांवर होणा-या अन्यायाविरूद्ध संघर्ष करणारे पी. डिमेलोनंतरचे नेते म्हणून एस. आर. कुलकर्णी परिचित आहेत.