विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

आयडीबीआय बँकेतील ९०० कोटी रुपयांचा गैरवापर करून परदेशात पळून गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय.

Updated: Apr 19, 2016, 02:49 PM IST
विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट title=

मुंबई : आयडीबीआय बँकेतील ९०० कोटी रुपयांचा गैरवापर करून परदेशात पळून गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय.

किंगफिशरची याचिका फेटाळली

मुंबईतील विशेष न्यायालयाने काल मनी लॉण्डरिंगप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेत. विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी हा निर्णय देतानाच ईडीच्या दाव्याविरुद्ध किंगफिशर एअरलाइन्सने दाखल केलेल्या याचिकाही फेटाळली.

ईडीची विनंती मान्य

न्यायालयाने मल्ल्याविरोधात अटक वॉरंट जारी करुन मोठा झटका दिलाय. आयडीबीआयकडून घेतलेल्या ९५० कोटी रुपयांपैकी ४३० कोटी रुपये परदेशात मालमत्ता खरेदीसाठी वापरल्याचे तपासादरम्यान उघडकीस आल्याने ‘ईडी’ने मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती कोर्टाला केली होती.