विजय माल्या मार्च अखेरीस भारतात, ईडीच्या नोटीशीचे काय?

उद्योजक आणि यूबी समुहाचे सर्वेसर्वा विजय माल्या मार्च महिन्याअखेरीस भारतात परतणार आहेत.

Updated: Mar 12, 2016, 01:08 PM IST
विजय माल्या मार्च अखेरीस भारतात,  ईडीच्या नोटीशीचे काय? title=

मुंबई : मद्य सम्राट आणि किंगफिशर एअर लाईन्सचे मालक विजय माल्ल्या सध्या चर्चेत आहेत. परदेश पलायनानंतर पत्रकारांवर टीका करणारे उद्योजक आणि यूबी समुहाचे सर्वेसर्वा विजय माल्या मार्च महिन्याअखेरीस भारतात परतणार आहेत.

विजय माल्या यांना ईडीनं शुक्रवारी समन्स बजावले असून १८ मार्च रोजी हजर रहाण्यास सांगितलंय. मात्र विजय मल्या हे या महिन्याच्या अखेरीस भारतात परततील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी सीबीआयला दिली आहे. 

दरम्यान मनी लाँड्रिंगप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचे माजी वित्त आधिकारी ए. रघुनाथ यांची शुक्रवारी इडीनं चौकशीही केली. IDBI बँकेचे 900 कोटी रुपये कर्ज थकवल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

डोक्यावर हजारो कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा असतांना ते परदेशात पळून गेल्याचा आरोप संसदेत विरोधी पक्षाने केला. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर आपण पळून गेलो नसल्याचं स्पष्टीकरण माल्ल्या यांनी दिलंय. यशस्वी उद्योगपती ते कर्जबारी असा प्रवास विजय मल्ल्यांनी केलाय.