विंदू पलटला, म्हणे- मयप्पनचा सट्टेबाजीत हात नाही!

चौकशीदरम्यान विंदू सिंगने आपला जवाब फिरवला आहे. मयप्पन यांचा स्पॉट फिक्सिंगशी संबंध नसल्याचं त्याने म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 28, 2013, 04:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या ताब्यात असलेला आरोपी विंदू सिंग, अल्पेश पटेल आणि प्रेम तनेजा यांना कोर्टानं ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. कोर्टानं या प्रकरणाचं गांभीर्य आणि मुंबई क्राईम ब्रांच करत असलेल्या तपासात होत असलेली प्रगती लक्षात घेऊन या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान विंदू सिंगने आपला जवाब फिरवला आहे. मयप्पन यांचा स्पॉट फिक्सिंगशी संबंध नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
विंदू सिंग याचं क्रिकेट जगतात आणि बुकींशी असलेल्या संबंधाचा वापर करून मॅच फिक्सिंग केल्याचा मुंबई क्राईम ब्रांचला संशय आहे. त्याच बरोबर श्रीनिवासन याचा जावई गुरुनाथ मयप्पन याची आणि विंदूची समोरासमोर बसवून केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. अल्पेश पटेल आणि प्रेम तनेजा यांचा विंदू आणि बुकींनी कसा वापर केलाय याबाबत अधिक तपास करायचाय. यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
कोर्टानं मुंबई क्राईम ब्रांचच्या विनंतीला मान देऊन तिन्ही आरोपींना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आपल्या पतीला वारंवार पोलीस कोठडीत पाठवलं जात आहे, त्याची फसवणूक करण्यात आलीये असं विंदूची पत्नी डीना सिंगनं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.