शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित

मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झालीय. महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 

Updated: Mar 4, 2017, 01:34 PM IST
शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित title=

मुंबई : मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झालीय. महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 

दुसरीकडे आत्तापर्यंत थांबा आणि वाट बघा असे करणारी भाजप कोअर कमिटीने मुंबई महापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.. भाजपचा उमेदवार थोड्याच वेळात महापौरपदाचा अर्ज दाखल करणार आहे. 

काँग्रेसनंही महापौरपदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलाय. तर दुसरीकडे सपाही महापौरपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. नगरसेवक रईस शेख हे महापौरपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत.