ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन झालं आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

Updated: Dec 23, 2016, 11:46 PM IST
ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन  title=

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन झालं आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते 78 वर्षांचे होते. रात्री नऊ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी संध्याकाळी वामन होवाळ यांना अस्वस्थ वाटू लागलं. रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. होवाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

वामन होवाळ यांच्या तीन कथा संग्रहांना राज्य सरकारचे उत्कृष्ट वाडमय निर्मीती पुरस्कार मिळालेत.

वामन होवाळ यांची गाजलेले कथासंग्रह

बेनवाडा

येळकोट

वाटा आडवाटा

वारसदार

'आमची कविता' हा कविता संग्रह वामन होवाळ यांनी संपादीत केला होता.