पाहा : या भारतीयांनी संघर्षासाठी निवडलं संगीताचं हत्यार... (डॉक्युमेंट्री सिरीज)

कोणत्याही अन्यायाविरोधात संघर्ष करायचा असेल तर आपल्या देशात आंदोलन, निषेध, किंवा शस्त्रांच्या माध्यमातून केला जातो.

Updated: Jan 25, 2016, 07:27 PM IST

मुंबई : कोणत्याही अन्यायाविरोधात संघर्ष करायचा असेल तर आपल्या देशात आंदोलन, निषेध, किंवा शस्त्रांच्या माध्यमातून केला जातो. पण पंजाबमधल्या झाभर गावातील बंतसिंग याने आपलं संघर्षाचं हत्यार काही तरी वेगळंच निवडलं आहे.

शेतमजुरांवर अन्याय करणाऱ्या जमीनदारांच्या विरोधात या शेतमजूर कार्यकर्त्याने हृदयाला साद घालणाऱ्या संगीताचा मार्ग निवडला आहे. संगीताच्या या हत्यारानं बंतसिंग यांनी पंजाबच्या ग्रामीण भागात नव्या क्रांतीची वाचा फोडली आहे.

देशात असे अनेक हिरो आहेत. जे वेगवेगळ्या अनोख्या माध्यमातून संघर्ष करत आहेत. अशाच हिरोंना आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा हिरोंची कथा आम्ही 'कॉड्स ऑफ चेंज' ( Chords of Change - A musical revolution) या नव्या कार्यक्रमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत. २६ जानेवारी पासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून दर गुरुवारी हा शो तुम्ही 'डीटो टीव्ही'वर, फेसबूक आणि युट्युबवर लाईव्ह पाहू शकणार आहात.

बदल घडवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयडिया, कथा आमच्या सोबत शेअर करू शकता. #StartAChange मध्ये टॅग करायला मात्र विसरू नका.

ही डॉक्युमेंट्री सिरीज तुम्ही  Ditto TV वर दर गुरूवारी पाहता येणार आहे.