राज्यात आमची सत्ता आणणार - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार पुन्हा एकदा शिवसैनिकांनी केलाय. मार्मिकच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यादृष्टीनंच शिवसैनिकांनी मोर्चेबांधणी केली.

Updated: Aug 14, 2014, 08:03 AM IST
राज्यात आमची सत्ता आणणार - उद्धव ठाकरे  title=

मुंबई : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार पुन्हा एकदा शिवसैनिकांनी केलाय. मार्मिकच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यादृष्टीनंच शिवसैनिकांनी मोर्चेबांधणी केली.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार असल्याचा पुनरुच्चार रामदास कदम यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. राज्य आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.

राज्यात शिवसेनेची सत्ता आणणार असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आधी केला होता. याचा पुनरुच्चार करण्यात आलाय. तसेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उद्धव यांना प्रमोट करण्यात आले आहे. तसेच भाजपने महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री असेल असे जाहीर म्हटले आहे. त्यामुळे युतीतील संघर्ष दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.