पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं

मुंबईची लाइफलाइन तब्बल २१ तासांनंतरही अजून विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन्स अजूनही बंद आहे.

Updated: Sep 16, 2015, 05:09 PM IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं  title=

सकाळी १०.३० वाजता -

तब्बल २२ तासांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर आलीय. पण वेळापत्रक कोलमडलं असून वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे. 

मुंबई: मुंबईची लाइफलाइन तब्बल २१ तासांनंतरही अजून विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन्स अजूनही बंद आहे.

रेल्वेप्रशासनाकडून वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून एक तास लागेल अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीय. अखेरचा डबा रेल्वेट्रॅकवरून हलविण्यात आलाय. 

- वांद्रे स्टेशनवरुन बोरीवलीसाठी ३ नंबर फ्लेफार्मवरुन विशेष फास्टगाडी सोडण्यात आली.
- चर्चगेटकडे जाणाऱ्या स्लो ट्रेन्स अर्धा ते पाऊण तास उशीरानं धावत आहेत. 
- वांद्रे स्टेशनवरून चर्चगेटकडे स्पेशल स्लो गाड्या सोडल्या जातायेत.
- बेस्टनं सकाळच्या सत्रात ३५ जादा बसेस या मार्गावर सोडल्या आहेत
- माहिम-गोराई ५ जादा बसेस सोडल्या 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.