www.24taas.com, झी मीडीया, मुंबई
आचार संहितेपूर्वी सरकारने टोल धोरण ठरवण्याचं आश्वासन दिलं आहे, जोपर्यंत टोलधोरण ठरवलं जात नाही, तो पर्यंत टोल भरू नका, आणि टोल कुणी जबरदस्तीने मागितला, तर कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालतो, ते पाहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.
राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद
पत्रकारांना ऐत कोलीत मिळालं असतं - राज
आरबीच्या मिफ्ताला गेलो नाही- राज
कंत्राटदारांच्या घरी थैमान घालू - राज
राज ठाकरेंचा टोल कंत्राटदारांना इशारा - राज
टोल धोरण येईपर्यंत टोल भरू नका - राज ठाकरे
महाराष्ट्रात टोल भरू नका - राज ठाकरे
ठाणे -ऐरोली एकदा टोल भरावा लागणार - राज
ठाणे वाशी प्रवासातील ऐरोली नाक्यावर ठाण्याची पावती दाखवल्यावर सूट
टोल ठरवण्याची पद्धत चुकीची - राज
ऑडीटर नेमण्यापर्यंत टोल बंद करा - राज
गाड्या मोजण्यासाठी यंत्रणा राबविणार
अनेक बीओटी प्रकल्पात घोळ- CM ची कबुली
महाराष्ट्रातील रस्त्याची स्थिती खराब, सीएमने मानले
मुख्यमंत्र्यासोबत `मफलर` ही होते - राज
५ ते १० कोटी रकमेचे खर्च ज्या रस्त्यांवर तेथ टोल रद्द करण्याविषयी सकारात्मक भूमिका
आचारसंहितेपूर्वी नवीन टोल धोरण
केंद्र सरकारच्या नियमांची पायमल्ली - राज
महाराष्ट्रात आलेल्या ट्रकला टेल लॅम्प नाही - राज
मुंबई-पुणे एक्स्प्रेस बांधणी झाली तरी कर्ज
२०० कोटी रु. गेले कुठे- राज
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या बांधणीसाठी कर्ज
कर्नाटकात १० किमी. अंतरावर बाथरूम - राज
टोलच्या बाजूला बाथरूम नाही- राज
झी २४ तासच्या टोल यात्रेची दखल
पुणे-सातारा रस्त्याची टोलची मुदत संपली
महाराष्ट्रात छोट्या प्रकल्पांना टोल का?- राज
कर्नाटकमध्ये १० कोटींखाली प्रकल्पांना टोल नाही
पीडब्ल्यूडीचे २२ टोल बंद होणार- राज
पीडब्ल्यूच्या २२ रस्त्यांवर १० कोटी आत खर्च
भाषणातील मुद्दे सविस्तर सीएमसमोर मांडले - राज
पारदर्शकता हवी यासाठी संपादकांना नेले - राज
आंदोलन मोठं होणार म्हणून त्यांनी मागण्या मान्य केल्या
मागणीचं पहिलं पत्र १० ऑगस्ट २०१२ ला पाठवलं - राज
सीएमसोबत बैठकीनंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.