व्हाटस् अॅप : शिवसेनेची पाच कॅबिनेट, दोन राज्यमंत्र्यांची यादी तयार

भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत घेण्यासाठी आमची तयारी आहे. राज्यातील जनतेशी तशी इच्छा आहे, असे मीडियाशी बोलताना सांगितले. त्याचवेळी शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर संभाव्य मंत्र्याची नावे व्हाट्स अॅपवर फिरत आहेत.

Updated: Nov 27, 2014, 05:18 PM IST
व्हाटस् अॅप : शिवसेनेची पाच कॅबिनेट, दोन राज्यमंत्र्यांची यादी तयार title=

मुंबई : भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत घेण्यासाठी आमची तयारी आहे. राज्यातील जनतेशी तशी इच्छा आहे, असे मीडियाशी बोलताना सांगितले. त्याचवेळी शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर संभाव्य मंत्र्याची नावे व्हाट्स अॅपवर फिरत आहेत.

शिवसेना नेतृत्वाने मंत्र्यांची यादी केल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. पाच कॅबिनेट, दोन राज्यमंत्र्यांची यादी तयार केल्याची माहिती, सूत्रांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही यादी व्हाट्सअॅपवर फिरत आहे. मात्र, या यादीशी 'झी २४ तास'चा काहीही संबंध नाही.

कॅबिनेट मंत्री
दिवाकर रावते  
नीलम गोऱ्हे
एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम, एमआरडीसी
विजय शिवतारे - कृषी

राज्य मंत्री
संजय राठोड  
गुलाबराव पाटील

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.