www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची निवड करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय. कोण आहेत हे राकेश मारिया... पाहुयात...
राकेश मारिया यांच्या आजवरची कारकिर्द
* राकेश मारिया १९८१च्या आयपीएस बॅच अधिकारी
* १९ जानेवारी १९५७ रोजी जन्म
* अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग
* १९९३ च्या मुंबई साखळी स्फोटांचा तपास
* दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडण्यात यशस्वी
* २००३ गेट वे आणि झवेरी बाजार स्फोटांचा तपास
* २६/११ मुंबई हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका
* पुणे जर्मन बेकरी स्फोटांचा तपास
* मुंबईत २०११ सालच्या स्फोटांचा तपास
* नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासातही सहभाग
राकेश मारिया यांच्यासमोरील आव्हाने...
* दहशतवादी हल्ल्यांपासून मुंबई सुरक्षित ठेवणे
* दहशतवाद मुकाबल्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करणे
* मुंबईच्या सागरी मार्गावरील सुरक्षा मजबूत करणे
* मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर करणे
* शक्तिमिल गँगरेपसारख्या घटना रोखणे
* स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालयाचा पाठपुरावा करणे
* मुंबईतील वाढती गुन्हेगारी कमी करणे, गँगस्टरना रोखणे
* हायटेक पोलीस ठाणी उभारण्यासाठी पुढाकार घेणे
* आरोपींना लवकर शिक्षा होण्यासाठी सक्षम फौज बनवणे
* इंटरनेट, सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारणे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.