म्हाडाची घरे कोणी लाटली?

बनावट कागदपत्रे, शिक्के, प्रमाणपत्रे तयार करून म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत फ्लॅटस् मिळवून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणार्यालला मुंबई क्राइम ब्रँच युनिट-१२ च्या पथकाने अटक केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 6, 2012, 06:24 PM IST

www.24taas.com,मुंबई
बनावट कागदपत्रे, शिक्के, प्रमाणपत्रे तयार करून म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत फ्लॅटस् मिळवून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणार्यालला मुंबई क्राइम ब्रँच युनिट-१२ च्या पथकाने अटक केली.
कंदर्प महेंद्र शर्मा (३१) यांने बनावट शिक्के, सरकारी कागदपत्रे तयार करून त्याआधारे म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत फ्लॅटस् मिळविले. तो बनावट दस्तावेज तयार करून विविध व्यक्तींच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत स्वतःचे खाते उघडत असे. त्याआधारे म्हाडाच्या मुंबई लॉटरी योजनेंतर्गत अर्ज करून फ्लॅटस् मिळवले. त्यानंतर ते फ्लॅटस् अन्य व्यक्तींना विकून स्वतःचा फायदा करून घेत असे.
गोरेगाव येथील आरे चेकनाक्याजवळ असलेल्या कार्यालयात बनावट दस्ताऐवज जाळणार असल्याची खबर युनिट-१२ ला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कंदर्प शर्मा याला पकडले.
जुलै २००८ पासून आतापर्यंत कंदर्प शर्मा याने बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडाच्या घरकुल योजनेंतर्गत अनेक घरे मिळवली. त्यानंतर ती विविध लोकांना विकली. असे करून त्याने म्हाडाची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कंदर्पच्या कार्यालयात अनेक लोकांच्या नावाचे शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्रे, अधिवासी प्रमाणपत्र, विविध संस्थांची आणि वृत्तपत्रांची लेटरहेडस्, बनावट वेतन प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सापडली आहेत.