मुंबई : दिघावासीयांना आंदोलनासाठी कोणी भडकवलं? त्यांची नावे न्यायालयाला सादर करा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने दिघावासीयांना आणि पोलिसांना फटकारलंय.
दिघा येथे न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई केली जात होती. या कारवाईच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ऐरोलीत आंदोलन करुन रेलरोको करण्यात आला. याचा परिणाम रेल्वे प्रवाशांना भोगावा लागला.
ही अशी आंदोलनं करायला तुम्हाला कोण सांगतं? कोर्टाने काही आदेश दिले तर त्याच्या निषेधसाठी देखील रेल रोको करणार का? न्यायालय निकल देण्याआधी संपूर्ण अभ्यास करतं. सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्या जातात. तारखांमागून तारखा देऊन न्यायालय निष्कर्षापर्यंत आल्यावर आंदोलन करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो, असं निरीक्षणही न्यायायानं नोंदवलं.