जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण? चर्चेला उधाण

मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना सौदी अरबमध्ये भारताचा राजदूत नियुक्त करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या जागेवर कोण विराजमान होणार याविषयी पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

Updated: Dec 19, 2015, 04:05 PM IST
जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण? चर्चेला उधाण title=

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना सौदी अरबमध्ये भारताचा राजदूत नियुक्त करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या जागेवर कोण विराजमान होणार याविषयी पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

सप्टेंबर महिन्यात शीना बोरा हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना बढती देत अहमद जावेद यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावर  नियुक्त आलं होतं. तेव्हा राज्य सरकारनं हे पद एडीजी वरून अपग्रेड करून डीजी रँक केलं होतं. आता हे पद पुन्हा 'डाऊनग्रेड' केलं जाणार का? हादेखील ओत्सुक्याचा मुद्दा बनलाय. 

अहमद जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे... पाहुयात कोण कोण आहेत ते... 

के. के. पाठक
आयपीएस ऑफिसर के. के. पाठक सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त आहे. त्यांनाही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त केलं जाऊ शकतं. 

मीरा बोरवणकर
जर सरकारनं डीजी रँकच्या आयपीएसला आयुक्त बनवण्याचा निर्णय घेतला तर पहिली महिला पोलीस आयुक्तच्या रुपात मीरा बोरवणकर किंवा एस. सी. माथुर यांच्यापैंकी एकाला ही संधी मिळू शकते. दोघंही १९८१ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 
 
सुबोध जयस्वाल
तेलगी घोटाळ्याची चौकशी करणारे सुबोध जयस्वालदेखील मुंबई पोलिसांच्या कमिशनर पदाच्या रेसमध्ये आहेत. सध्या ते देशाबाहेर डेप्युटेशनवर आहेत.

दत्ता डी. पडसाळगीकर 
आयबीमध्ये तैनात १९८२ बॅचचे आयपीएस ऑफिसर दत्ता डी. पळसाळगीकर यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. सध्या त्यांचं रँक एडीजी आहे. 

संजय बर्वे
महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलीस आयुक्त पद एडीजी स्तराचं केलं तर या शर्यतीत १९८७ बॅचचे आयपीएस ऑफिसर संजय बर्वेदेखील सहभागी होऊ शकतात