मुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा

सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.

Updated: Aug 22, 2016, 09:07 AM IST
मुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा title=

मुंबई : सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सुविधेचं उद्घाटन करतील. रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना वर्षभरात देशातल्या 100 स्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्याचं लक्ष्य जाहीर करण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणून ही सुविधा सुरू होणार आहे. सध्या मुंबईत फक्त मुंबई सेंट्रल स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे.

दरम्यान आज ज्या सहा स्टेशनवर नवी सेवा सुरू होणार आहे, त्यापैकी काही स्टेशनवर रेल्वे प्रशासनानं आधीच प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू केली आहे.