काँग्रेसमधून बाहेर पडणार? प्रश्नावर राणेंनी दिलं उत्तर...

काँग्रेसमधून बाहेर पडणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर 'रोखठोक' या कार्यक्रमात अगदी सूचक शब्दांत देऊन टाकलंय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 24, 2017, 12:10 AM IST
काँग्रेसमधून बाहेर पडणार? प्रश्नावर राणेंनी दिलं उत्तर... title=

मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर 'रोखठोक' या कार्यक्रमात अगदी सूचक शब्दांत देऊन टाकलंय. 

नारायण राणे पक्षात अस्वस्थ आहेत... हे अनेकदा त्यांच्या बोलण्यातून समोर येतंय. त्यानंतर बुधवारी विधान भवनात दुपारी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊन राणेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली... आणि या चर्चेला आणखीनच उधाण आलं. 

'मला जेव्हा प्रहार करायचा तेव्हा मला कुणी थांबवू शकत नाही... भूकंप काही सांगून होत नाही... त्सुनामी कधी सांगून येत नाही... पुढची वाटचाल  मी काही आत्ताच उघड करणार नाही...' असं म्हणत आगे आगे देखो होता है क्या... असा पवित्रा राणेंनी घेतलाय.