मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर विधान परिषद निवडणुकीच्या आचार संहितेचे सावट असणार आहे. सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.
मुंबई, नागपूरसह आठ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. ही निवडणूक २७ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे संबंधित महापालिका आणि नगरपालिकांशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारला अधिवेशनात घेता येणार नाहीय.
मतदारसंघात प्रभाव पडेल, असा कोणताही निर्णय सरकारला आचारसंहितेच्या काळात घेता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. त्यामुळे अधिवेशनात धोरणात्मक निर्णय घेताना सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.