राज ठाकरेंनी सांगितलेलं `येणेगूर टोलनाक्याचं गौडबंगाल`

राज ठाकरे यांनी पुण्याच्या भाषणात येणेगूर टोलनाक्याचा उच्चार केला होता. हा टोल नाका कशासाठी आहे, हेच माहित नाही आणि ३ कोटी वसुली २ महिन्यात होते, तरीही वर्षभरापासून येथे वसुली सुरूच आहे.

Updated: Feb 10, 2014, 11:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरे यांनी पुण्याच्या भाषणात येणेगूर टोलनाक्याचा उच्चार केला होता. हा टोल नाका कशासाठी आहे, हेच माहित नाही आणि ३ कोटी वसुली २ महिन्यात होते, तरीही वर्षभरापासून येथे वसुली सुरूच आहे.
राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत खालील माहिती दिली, ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर टोलनाक्याचं गौडबंगाल
हा टोलनाका कोणत्याही पुलाकरीता अथवा रस्त्यासाठी नाही
तरीही येणेगूर हा टोल नाका ३ कोटीचा खर्च वसूल करण्यासाठी आहे
येणेगूर टोलनाक्यावर २४ तासांत ३० हजार वाहनांची ये-जा
दिवसभरात सरासरी ५ लाख रूपयांची टोल वसुली
या प्रमाणे दोन महिन्यात ३ कोटी वसूल
तरीही अजुनही टोल वसुली सुरूच
टोल वसुलीचा कार्यकाळ १७ डिसेंबर २००२ ते २० नोव्हेंबर २०११
टोल वसुलीला मुदतवाढ २१ नोव्हेंबर २०११ ते १९ नोव्हेंबर २०१२

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.