झाकीर नाईक याची झी मीडियाच्या प्रश्नाने बोलती बंद

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकने दिले. दरम्यान, पत्रकार परिषदेत झी मीडियाचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्या प्रश्नाने झाकीर याची बोलती बंद झाली.

Updated: Jul 15, 2016, 07:17 PM IST
झाकीर नाईक याची झी मीडियाच्या प्रश्नाने बोलती बंद title=

मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आयसीसीची विरोधक आहे आणि हिंसेचं कुठलही समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण डॉ. झाकीर नाईकने दिले. दरम्यान, पत्रकार परिषदेत झी मीडियाचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्या प्रश्नाने झाकीर याची बोलती बंद झाली.

आत्मघातकी हल्ले इस्लामविरोधी असल्याचंही सांगताना युद्धात असे हल्ले योग्य असल्याचं मत झाकीर नाईकनं आज सौदी अरेबियातून व्यक्त केलं. मी आणि माझं चॅनेल काहीही चुकींच करत नसल्याचंही झाकीर नाईकनं म्हटले आहे. मात्र, भारतात मुस्लीमांची स्थिती काय आहे. किती लोक शिक्षणापासून वंचित आहेत. किती लोकांचे उद्योगधंदे सुरु आहेत. याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? काही आकडेवारी आपल्याकडे आहे का? या प्रश्नावर झाकीरला उत्तर देता आले नाही. दरम्यान, निमंत्रण देऊनही त्रिवेदी यांना काहींही प्रश्न विचारण्यापासून रोखण्यात आले.

बांग्लादेशात झालेल्या हल्ल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला डॉ. झाकीर नाईक सौदी अरेबियामधून स्काईपवरून प्रथमच पत्रकारांसमोर आला.या पत्रकार परिषदेत माजी पोलिस अधिकारी शमशेर खान, प्रसिद्ध वकील मोबीन सोलकर आणि झाकीर नाईकच्या संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. झाकीर नाईकच्या फेसबुक पेजला चार कोटी वीस लाख लाईक्स असल्याचंही यावेळी सांगण्यात आले. 

दरम्यान, जर पीस टीव्हीवर बंदी घालायची असेल तर सुदर्शन टीव्हीवर पण बंदी घाला, असे वक्तव्य केले आहे काँग्रेस नेते दि्ग्विजय सिंग यांनी. दिग्विजय सिंह पुण्यात बोलत होते. झाकीर नाईक शांततेचा प्रसार करतात, असेही ते म्हणालेत. त्याचबरोबर धर्माच्या नावावर जे भडकाऊ बोलतात, त्यांच्यावरही कारवाई करावी, असंही ते म्हणालेत.