मुंबई : झी 24 तासच्या वृत्तानंतर मुंबई मेट्रोचे कर्मचारी ताळ्यावर आले आहेत. प्रवाशांकडून रियालयन्स मेट्रोनं पाचशे आणि हजाराच्या नोटा स्विकारण्यास सुरूवात केली आहे.
पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांकडून या नोटा घेण्यास मेट्रो कर्मचा-यांनी नकार दिला होता. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या नोटा घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र रिलायन्सच्या उद्दाम कर्मचा-यांनी आपला आडमुठेपणा सुरूच ठेवला होता. त्यानंतर झी 24 तासनं हे वृत्ता दाखवल्यानंतर मेट्रोनं अखेर या नोटा घेण्यास सुरूवात केली.