आता बैलांच्या शर्यतीला 'कोर्टाची वेसण'

ग्रामीण भागात मनोरंजन आणि परंपरेच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यंतीवर सरसकट बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जुलै २०११मध्ये केंद्र सरकारनं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली होती.

Updated: Mar 13, 2012, 05:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

ग्रामीण भागात मनोरंजन आणि परंपरेच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यंतीवर सरसकट बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जुलै २०११मध्ये केंद्र सरकारनं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली होती.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचे जोरदार पडसाद उमटल्यानंतर राज्य सरकारनं सुधारीत शुद्धीपत्र जारी केले आणि प्राण्यांची वर्गवारी करुन वळू, सांड यांचा शर्यतीसाठी वापर केला जाऊ शकतो. असे स्पष्ट केले.

अशा पळवाटांच्या माध्यमातून राज्यात बैलांच्या शर्यती सुरुच होत्या. पण हायकोर्टानं वर्गवारीवर ताशेरे ओढत राज्य शासनानं बैलांच्या शर्यतींना मंजूरी देणारं शुद्धीपत्र हायकोर्टानं रद्द केलं आहे. त्यामुळं आता राज्यात बैलांच्या शर्यतीवर सरसकट बंदी असणार आहे.