गिरणी कामगारांचे बेमुदत उपोषण

मुंबईतल्या गिरणी कामगार नेत्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. घरांच्या किंमती ठरवण्यात सरकार उदासिन असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला आहे.

Updated: Apr 10, 2012, 01:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या गिरणी कामगार नेत्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. घरांच्या किंमती ठरवण्यात सरकार उदासिन असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला आहे.

सरकारच्या उदासिनवृत्तीचा निषेध करण्यासाठी कामगार नेते उपोषणाला बसलेत. गिरणी कामगारांबरोबर २० फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत घरांच्या किंमती ठरवण्याचे आश्वासन देण्यात आलं होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं तरीही सरकारला घरांच्या किंमती ठरवण्यासाठी वेळ मिळालेला नाही, सरकारच्या उदासिन आणि वेळकाढूपणाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे.