गुंतवणुकीत सुधारणा, शेअर निर्देशांकात वाढ

जागतिक बाजारपेठेत सुधारणा झाल्याने गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मुंबई शेअर निर्देशांकात आज जवळपास ३०० अंशांनी वाढ झाली.

Updated: Oct 25, 2011, 06:34 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

जागतिक बाजारपेठेत सुधारणा झाल्याने गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मुंबई शेअर निर्देशांकात आज जवळपास ३०० अंशांनी वाढ झाली.

 

गेल्या दोन सत्रात सुमारे ३०० अंशांनी घसरलेला मुंबई शेअर निर्देशांक आज सकाळी कामकाज सुरू झाल्याबरोबर ३००अंशांनी वधारला. शेअर निर्देशांकाच्या एकूण १.७९ टक्यांकानी वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे निर्देशांक १७,०८६.४७ वर पोहोचला आहे.

 

धातू, प्रॉपर्टी, माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्रातील शेअर्सच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निफ्टी शेअर निर्देशांक ९१.१५ टक्‍क्‍यांनी वाढून ५१,४१.१० अंशांवर गेला आहे.

 

आशियातील शेअर बाजारांचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे मत शेअर दलालांनी व्यक्त केले आहे.