गॅस कर : मागे घेण्यासाठी विरोधकांचा दबाव

गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलिंडरवर पाच टक्के कर लावल्यानं सरकारला २००कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

Updated: Mar 28, 2012, 03:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलिंडरवर पाच टक्के कर लावल्यानं सरकारला २००कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

 

 

ही करवाढ पूर्णता: मागे घेतली तर १५२ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मंजुरीपूर्वीच तुटीचा होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच टक्क्यांवरील कर ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची तयारी दर्शवलीये. पण विरोधकांनी करवाढ पूर्णता मागे घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडून सुद्धा तसा दबाव येत असल्याने राष्ट्रवादीची पर्यायाने अजित पवारांची कोंडी झाली आहे.

 

 

स्वयंपाकाच्या गॅसवर केलेली पाच टक्के दरवाढ मागे घेण्यासाठी दबाव वाढल्यानं अर्थमंत्री अजित पवार तसा निर्णय घेण्याची शक्यता दुणावली आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधा-यांच्या विरोधामुळे गॅसदरवाढ मागे घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. दरवाढीबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे पवार यांनी ‘झी २४ तास’शी बोलताना सांगिरले.

 

 

आधी विरोधी शिवसेना-भाजप-मनसे आणि नंतर काँग्रेसनंही गॅस दरवाढीला विरोध करून अजित पवारांची कोंडी केल्यानंतर आता राष्ट्रवादीनंही तसाच पवित्रा घेतलाय. अर्थात दरवाढ कमी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार करत असले तरी काँग्रेसला शह देण्यासाठी अजितदादांना हे पाऊल उचलावं लागल्याची चर्चा आहे.