छगन भुजबळ महाघोटाळेबाज - सोमय्या

महाघोटाळे करुनही मंत्रीपदावर कायम राहणा-या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडं करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय.

Updated: Jul 22, 2012, 01:22 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाघोटाळे करुनही मंत्रीपदावर कायम राहणा-या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडं करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आता छगन भुजबळ काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

 

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळा वाढतच चालला असून यासंदर्भातल्या फाईल्स गायब करण्याची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्र सदन, मलबार हिल इथलं हाय माउंटन अतिथी गृह आणि अंधेरी इथलं आरटीओ कार्यालय हे झोपडपट्टी पूर्नवसनअंतर्गत बांधलं असून या सगळ्य़ा बांधकामाचा खर्च ३००कोटी रुपयापर्यंत आला.

 

या तिन्ही प्रकल्पाचे बांधकाम भूजबळांनी चमनकर या खाजगी विकासकाला दिलंय़. या सगळ्याचा एकूण एफएसआय 30 लाख स्क्वेअर फूट एफएसआय मंजूर करण्यात आला असून याची किंमत १० हजार कोटी इतकी आहे. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.असून येत्या 2-3 आठवड्यांत भूजबळांचे आणखी कारनामे उघड करणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी दिलाय.

 

भुजबळांच्या परदेशात किती कंपन्या आहेत, पदेशात गुंतवणूक किती आहे आणि इंडोनेशियात खाणी आहेत का. याची माहिती भुजबळांनी द्यावी. असं आवाहन त्यांनी केलंय.