जगाने पाहिलं, मुंबईने मात्र हुकवलं

आज जगभरात शुक्र अधिक्रमणाचा अद्भूत नजारा अनुभवता आला. मुंबईत मात्र हा नजारा अनुभवण्यसाठी नेहरु तारांगणमध्ये जमलेल्या खगोलप्रेमींचा हिरमोड झाला.

Updated: Jun 6, 2012, 11:59 AM IST

www.24taas.com, मुंबई

आज जगभरात शुक्र अधिक्रमणाचा अद्भूत नजारा अनुभवता आला. मुंबईत मात्र हा नजारा अनुभवण्यसाठी नेहरु तारांगणमध्ये जमलेल्या खगोलप्रेमींचा हिरमोड झाला.

मुंबईकरांना सूर्यादयानंतर काही वेळच सूर्य-शुक्र मिलनाचं दृश्य अनुभवता आलं. त्यानंतर मात्र सूर्य ढगांच्या आड लपला. आज भल्या मोठ्या सूर्यबिंबाच्या व्यासावरुन मार्गक्रमण करणारा शुक्र पाहण्याचा अनुभव अनेकांनी घेतला.

सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये शुक्र आल्यामुळे हे विलोभनीय दृश्य आज पाहता आलं. आता हा योग थेट 105 वर्षांनी येणार आहे. खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमींबरोबरच हौशी नागरिकांनीही हे दुर्मिळ दृश्य पाहण्याचा आनंद लुटला.