www.24taas.com, मुंबई
ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे वसईतील रुग्णालयात निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
मृणालताईंनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणीबाणीचा लढा हे त्याचे प्रमुख लढे होते. ‘पाणीवाली बाई’ म्हणून मृणालताईंना ओळख होते.
वसईत मुलगी अंजली वर्तक यांच्याकडे गेलेल्या असताना त्यांना घशाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचं निधन झाले.
मृणाल गोरे या काही काळ आमदार आणि खासदारही होत्या. १९७२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडणून आल्या होत्या.
महाराष्ट्राची रणरागिणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्याचे पार्थिव उद्या केशवराव गोरे ट्रस्टमध्ये सकाळी १० वाजेपासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
शरद पवारांनी घेतली होती मृणालताईंची भेट
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नुकतीच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांची त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
मृणाल गोरे यांची प्रकृती बरी नसल्याने कळल्यावर शरद पवार यांनी गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मृणाल गोरे या विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यामुळे दोघांच्या भेटीत साहजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि दोघांच्या गप्पा जवळपास तासभर रंगल्या. पुलोदचे सरकार, गोरे यांची विरोधी पक्षनेतेपदाची कारकीर्द अशा विविध आठवणी निघाल्या.
माजी खासदार व ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते आणि इतर जुन्या सहकाऱ्यांचे विषयही निघाले. पूर्वीच्या काळातील विरोधी पक्षांची आंदोलने आणि आताचा काळ यावर उभयतांत चर्चा झाली.