दिवेआगर मंदिर दरोडा : उद्धव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

दिवेआगरच्या गणेश मूर्ती चोरीप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली. विधिमंडळाचं कामकाज सुरु असल्यानं त्यांनी विधिमंडळात जाऊन त्यांची भेट घेतली.

Updated: Mar 27, 2012, 08:30 PM IST

www.24taas.com, मुंबई

दिवेआगरच्या गणेश मूर्ती चोरीप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली. विधिमंडळाचं कामकाज सुरु असल्यानं त्यांनी विधिमंडळात जाऊन त्यांची भेट घेतली.

दिवेआगरच्या मंदिरातून सोन्याची मुर्ती आणि दागिने चोरीला जाणं निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले. तसंच येत्या गुरूवारी मुंबईत दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात या घटनेचा निषेध करण्यासाठी ते घंटानाद आंदोलन करणार आहेत. आणि २९ तारखेला म्हणजे गुरूवारीच रायगड बंदचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आलाय.

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला होता.  पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा रात्री घालण्यात आला.