www.24taas.com,मुंबई
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांची आज सोनंटंचाईमुळे गैरसोय होऊ शकते. त्यामुळे साडेतीन मुहुर्तावर सोनं घेणा-यांनी घाई करणं गरजेचं आहे. सराफा व्यापा-यांच्या संपामुळे घाऊक बाजारपेठा बंद असल्यानं बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांच्या मागणीनुसार सोन्याचा पुरवठा होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. आजच्या दिवशी रिटेल दुकानं सुरु राहणार असली तरी झवेरीबाजारसह घाऊक बाजारपेठा मात्र बंदच राहणार आहेत. त्यामुळे सोन्याचा पुरवठा होणार नाही. आयातशुल्क वाढवल्यानं सराफा व्यापा-यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यापासून बेमुदत संप सुरु केला आहे. त्याचा फटका पाडव्याच्या मुहुर्तावर सोनं खरेदी करणा-या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.
रिटेल दुकानं सुरु असली तरी झवेरीबाजारसह घाऊक बाजारपेठा मात्र बंद आहेत. त्यामुळे सोन्याचा पुरवठा झाला नाही तर ग्राहकांना सोने खरेदी करता येणार नाही. तसेच या टंचाईमुळे सोन आखणी माहगण्याची भित वर्तविण्यात आली आहे.