मंत्रालयाची आग घातपात नाही- फॉरेंन्सिक लॅब

मंत्रालयाला लागलेली आग हा एक घातपात नसून निव्वळ अपघात असल्याचा निष्कर्ष मुंबईतील फोरेंनसिक लॅबने काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रालयाच्या इमारतीला आग लावल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Updated: Jul 1, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयाला लागलेली आग हा एक घातपात नसून निव्वळ अपघात असल्याचा निष्कर्ष मुंबईतील फॉरेन्सिक  लॅबने काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रालयाच्या इमारतीला आग लावल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

 

यासाठी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरील विविध ४५ नमुन्यांची तपासणी फॉरेन्सिक लॅबच्या अधिका-यांनी केली. यामध्ये आग मुद्दामून लावण्यात आली आहे, अशी कोणतीही गोष्ट आढळली नाही किंवा तसा कुठलाही पुरावा सापडला नाही. चौथ्या मजल्यावरील स्विचरुममध्ये आग सर्वप्रथम भडकली आणि एअर कंडिशनच्या कॉप्रेसरच्या स्फोटामुळे आग पसरली असल्याचाही प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मंत्रालय आगीची चौकशी करणा-या गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा अहवाल शनिवारी देण्यात आला. त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाने १०० सीसीटीव्ही कॅमे-यांच्या फुटेजची कसून तपासणी केली.

 

यामध्येही काहीही संशयास्पद आढळून आलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. त्यामुळे मंत्रालयाच्या आगीनंतर जो घातपाताच्या संशयाचा धूर तयार झाला होता त्यावर आता पडदा पडणार आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचा तपास अंतिम टप्प्यात पोहचला असून लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="130913"]

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x