www.24taas.com, मुंबई
राज्यात स्त्रीभ्रूण हत्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मात्र आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भ्रूणहत्या आणि गर्भपाताच्या घटनांमध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. तर महानगरांमध्ये मुंबई तिस-या क्रमांकावर आहे.
एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं हे वास्तव समोर आणलंय. 2007 ते 2011 या कालाधीत महाराष्ट्रात १२३२ गर्भपात आणि भ्रूणहत्यांची नोंद झालीय. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली या राज्यांच्या तुलनेत ही आकडेवारी जास्त असल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात गेल्या ५ वर्षात गर्भपात आणि भ्रूणहत्येच्या घटना घडल्या नसल्याचं या अहवालात समोर आलंय. तर मुंबईत या कालावधीत ११४ गर्भपात आणि भ्रूणहत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे.