"मीच का दोषी?"- भुजबळ

शिक्षण संस्थांना कमी किंमतीत भूखंड देण्याबाबत कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने राज्यात अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबतीत सर्वांना समान न्याय असताना मलाच का दोषी ठरवण्यात येतंय, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

Updated: Apr 12, 2012, 11:26 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिक्षण संस्थांना कमी किंमतीत भूखंड देण्याबाबत कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने राज्यात अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबतीत सर्वांना समान न्याय असताना मलाच का दोषी ठरवण्यात येतंय, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केलाय. सर्व नेत्यांना, विरोधकांना आणि उद्योगांना सवलतीच्या दरात भूखंड देण्यात आलेले असताना एमईटीच्या भूखंडाबाबतच रंगणाऱ्या चर्चेचं खापर भुजबळांनी माध्यमांवर फोडलंय.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नऊ कोटींची जमीन नऊ लाखांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वित्त सचिवांनी हरकतीचा शेरा मारल्यानंतरही ही जमीन देण्यात आल्याचं कॅगनं आपल्या अहवालात नमूद केलंय.

 

एमईटीचा अशैक्षणिक आणि व्यापारी उद्देशासाठी वापर होत असल्याचा आरोप संस्थेचे संस्थापक विश्वस्त सुनील कर्वे यांनी केला होता. शिवाय या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज ही पाहणी सुरु करण्यात आली आहे.