मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र बागलकर तर गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं.
सुनील प्रभू हे सलग चार वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत तर सुरेंद्र बागलकरांची ही दुसरी टर्म आहे. सुनील प्रभू यांची ओळख एक अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेवक अशी आहे. राहुल शेवाळे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे. राहुल शेवाळे हे तीन वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत.