बॉलिवूडमधील अभिनेत्रीने लेकीचं नाव ठेवलं 'मतारा'; अनोख्या पद्धतीने केलं शेअर

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हीने लग्नाच्या 8 महिन्यांनंतर मुलीला जन्म दिला. नुकतंच, सोशल मिडीयावर तिने आपल्या मुलीच्या नावाचा आणि नावाच्या अर्थाचा खुलासा केला आहे.

Updated: Jan 14, 2025, 11:29 AM IST
बॉलिवूडमधील अभिनेत्रीने लेकीचं नाव ठेवलं 'मतारा'; अनोख्या पद्धतीने केलं शेअर title=

Masaba Daughter Name: बॉलीवूड सिनासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नीता गुप्ता हीची मुलगी मसाबा गुप्ता आता चर्चेत आली आहे. मसाबाने फॅशन डिझायनर म्हणून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षीच ऑक्टोबर मध्ये मसाबाने एका मुलीला जन्म दिला आणि नुकतंच तिचं नाव सुद्धा ठेवण्यात आलं आहे. मसाबाने आपल्या मुलीचं एक अनोखं नाव ठेवून याबाबतीत दिपिका आणि आलियाला सुद्धा मागे टाकल्याची चर्चा रंगत आहेत. 

मसाबा 2023 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत विवाहबंधनात अडकली होती आणि लग्नानंतर वर्षभरातच 11 ऑक्टोबरला तिने एका गोड मुलीला जन्म दिला. नुकतंच मसाबाने आपल्या हातासोबत आपल्या मुलीचा छोटा आणि गोंडस हात असलेला एक सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. पहिल्यांदाच मसाबाने आपल्या चाहत्यांना दाखवण्यासाठी मुलीसोबतचा हा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यात मसाबाने तिच्या मुलीच्या नावाचासुद्धा खुलासा केला आहे. तिच्या अनोख्या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मसाबाने आपल्या मुलीचं नाव 'मतारा' असं ठेवलं आहे. 

काय आहे मसाबाच्या मुलीच्या नावाचा अर्थ?

मसाबाने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने आपल्या हातात सोन्याची बांगडी घातली असून त्या बांगडीवर 'मतारा' असे लिहिल्याचं दिसत आहे. या फोटोसोबत मसाबाने 'मतारा'ला तीन महिने पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. तसेच, तिने 'मतारा' या अनोख्या नावाचा अर्थ सुद्धा स्पष्ट केला आहे. 'मतारा' हे नाव ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक असून, नऊ हिंदू देवींच्या दिव्य ऊर्जेशी निगडीत असल्याचं मसाबाने सांगितलं. तसेच, 'मतारा ही माझ्या डोळ्यांतील तारा आहे.' असंसुद्धा तिने लिहिलं. मसाबाच्या मुलीचे अनोखे नाव आणि तिच्या नावाच्या तितकाच अनोखा अर्थ जाणून चाहते सुद्धा सोशल मिडीयावर अगदी आनंदाने व्यक्त होत आहेत. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba  (@masabagupta)

फोटोवरील चाहत्यांच्या प्रतिक्रिया

मसाबाने आपल्या मुलीसोबत शेअर केलेल्या गोंडस फोटोवर चाहत्यांच्या अत्यंत आनंदी प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अतिशय सुंदर नाव असल्याचं एका नेटकऱ्यानं सांगितलं. दुसऱ्या नेटकरी या फोटोवर म्हणाला, "मला आठवतं, अलीकडेच मी रणवीरचा एक पॉडकास्ट ऐकला होता, ज्यामध्ये राजर्षी नंदी 'माँ तारा' बद्दल बोलल्या होत्या आणि हे नावसुद्धा खूप सुंदर आहे." यासोबतंच 'मतारा' हे नाव खूपच स्टायलिश आणि युनिक असल्याचं बऱ्याच नेटकऱ्यांनी सांगितलं. मसाबा आणि सत्यदीपचं 2023 मध्ये लग्न झालं आणि लग्नाच्या जवळपास आठ महिन्यांनंतर त्यांना एक गोड मुलगी झाली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x