राजू शेट्टींना राज यांचा पाठिंबा

उसाच्या दरावरून शेतकरी संघटनेचा आमदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. सरकारने नाटक केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशी धमकी वजा इशारा राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

Updated: Nov 10, 2011, 11:51 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

उसाच्या दरावरून शेतकरी संघटनेचा आमदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. सरकारने नाटक केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशी धमकी वजा इशारा राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

शेतकरी बांधवांना माझा पाठिंबा आहे, मुळात दरवर्षी शेतकरी बांधवांना आंदोलन करण्याची वेळच का येते, सध्या राज्यात कारखानदार हे गब्बर झाले आहेत, अशी बोंब आहे मात्र कारखाने आज

सरकारमध्ये जे लोक बसले आहेत, तेच साखर कारखानदार आहेत. साखर कारखानदारी आहे की राजकीय दुकानदारी हे मला कळत नाही. आज नेत्यांची ऐष सुरू आहे. भोगतोय मात्र शेतकरी त्यामुळे सर्वमान्य तोडगा काढा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

मुळात सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधायचा हे कळत नाही. उद्या उठून रस्त्यावर उत्तरलेला शेतकरी पेटला आणि या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले, तर त्यास जबाबदार कोण, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केवळ बोलण्यापुरता पाठिंबा दिला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नाशिकचे मनसेचे आमदार वसंत गीते यांना अटक झाल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या सरकारमधील लोकांना सहकार क्षेत्र मातीत घालून त्याचे खासगीकरण करायचे आहे. हाच यांचा डाव आहे. हळूहळू त्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राज यांनी केला.