शाहरूखचे प्रकरण गंभीर - विलासराव

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला प्रकार दुर्दैवी आहे. शाहरूख खानचे प्रकरण गंभीर आहे, असे मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी स्पष्ट करताना शाहरूखबाबतच्या तक्रारीसंदर्भात पोलीस चौकशी करतील , असे सांगून याबाबत हात झटकले आहेत.

Updated: May 17, 2012, 01:15 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला प्रकार दुर्दैवी आहे. शाहरूख खानचे प्रकरण  गंभीर आहे, असे मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी स्पष्ट करताना शाहरूखबाबतच्या तक्रारीसंदर्भात पोलीस चौकशी करतील , असे सांगून याबाबत हात झटकले आहेत.

 

तर आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला म्हणाले, शाहरूखबाबतच्या सर्व बाबींची खातरजमा करून कारवाई केली जाईल. त्यामुळे शाहरूख  प्रकरणात  पदाधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून आले.

 

वानखेडे स्टेडियमवर रात्री उशीरा नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी शाहरुख वादाच्या भोव-यात सापडलाय. कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या मॅचनंतर शाहरुख ड्रेसिंग रुममध्ये गेला त्यानंतर त्यानं वानखेडेवर घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांने सुरक्षारक्षाकाला मारहाणही केली.

 

याबाबत शाहरूख विरोधात तक्रारही करण्यात आली आहे. याप्रकरणानंतर विलासराव यांनी पत्रकार परिषद घेतली.  त्यावेळी ते म्हणाले,  शाहरूखच्या बंदीबाबत मॅनेजमेंट कमिटी निर्णय घेईल. तर त्याच्या तक्रारीबाबत पोलीस चौकशी करतील , असे सांगून आपण काहीही करणार नाही, हे स्पष्ट केले.

 

दरम्यान,  या प्रकरणी सर्व संबंधितांचे जबाब घेऊनच बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे आयपीएलच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे. या संदर्भात एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर एमसीएचे अन्य पदाधिकारी, शाहरुख खान आणि पोलिसांकडून माहिती घेऊनच या निर्णयाला अंतिम रूप दिले जाईल, असे आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला म्हणाले.

 

 

किर्ती आझाद यांचा बीसीसीआयवर हल्ला

शाहरुख खान नशेत धिंगाणा घालणं अशक्य असल्याचं मत माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी व्यक्त केलं आहे. आयपीएलमधील  स्पॉट फिक्सिंगच्या प्ररकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीसीसीआयनं ही खेळी खेळली, असा  थेट आरोप करत किर्ती आझाद यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

 

शाहरुख खान हा एका टीमचा मालक आहे. शाहरुख खान नशेत आणि तेही लहान मुलं सोबत असताना धिंगाणा घालणं, ही केवळ अशक्यप्राय गोष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मॅच फिक्सिंगप्रकरणी लक्ष विचलीत करण्यासाठी शाहरूखचा वापर केला जातोय. आणि ही सगळी बीसीसीआयची खेळी आहे, असा गंभीर आरोप किर्ती आझाद यांनी केला आहे.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="102715"]