www.24taas.com, मुंबई
कोलकाता नाईट रायडर्सच्या मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर शाहरूखने बुधवारी मध्यरात्री वानखेडे स्टेडियमवर धिंगाणा घातला. सुरक्षा रक्षाकाला मारहाण करणाऱ्या दर्टी खान विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. शाहरूखच्या धिंगाण्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत शाहरुखला वानखेडेवर प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सर्व चर्चेअंती निर्णय घेतला जाईल, असे आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स-मुंबई इंडियन्स सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभात शाहरूखने आपली मुले आणिअंगरक्षकांसह आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या कारणावरून सुरक्षारक्षकांनी मुलांसह इतर व्यक्तींना आत जाण्यास मनाई केली. यामुळे चिडलेल्या शहरूखने सुरक्षारक्षकांसह मुंबई क्रिकेट संघटनेच्या काही सदस्यांना धक्काबुक्की आणि लोखोली वाहीली. यात एमसीए समितीचे सदस्य व एसीपी इक्बाल शेख यांनाही धक्कबुक्की झाली. शाहरूख यावेळी धुंदीत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास शाहरूखवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय होवू शकतो, अशी सुत्रांची माहिती आहे. शाहरुखने वानखेडेवर जो धिंगाणा घातला तो सर्व मैदानावरील सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये बंदिस्त झाला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="102679"]