www.24taas.com, मुंबई
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी आता सरकारनं केंद्र सरकारकडं मदतीचा हात मागण्याची तयारी केली आहे. दुष्काळ निवारणासाठी निधी मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.
उद्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांची हे शिष्टमंडळ दिल्लीत भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि कृषीमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचा समावेश आहे.
दुष्काळावरील उपाययोजना आणि त्यासाठी लागणारा निधी या संदर्भात राज्याचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार हे दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यास सक्षम नाही असचं दिसून येतं.