सुभाष चंद्रा यांच्या हस्ते 'कॉफी टेबल'चे प्रकाशन

डीएनए वृत्तपत्रानं मुंबईत एस्सेल समुहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्या हस्ते कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं. कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मुंबईतील रिअल इस्टेटच्या व्यवसायाशी जोडलेली नवी आणि जुनी पिढी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. तसंच यावेळी रिअल इस्टेटच्या क्षेत्रातला दिग्गजांचा सन्मानही करण्यात आला.

Updated: Jul 12, 2012, 08:56 PM IST

www.24taas.com, मुंबई

डीएनए वृत्तपत्रानं मुंबईत एस्सेल समुहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्या हस्ते कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं. कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मुंबईतील रिअल इस्टेटच्या व्यवसायाशी जोडलेली नवी आणि जुनी पिढी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. तसंच यावेळी रिअल इस्टेटच्या क्षेत्रातला दिग्गजांचा सन्मानही करण्यात आला.

डीएनएच्या या कॉफी टेबल बुकमध्ये शहराच्या स्काय लाईनला नवी उंची देणा-या रिअल इस्टेटमधल्या नव्या आणि जुन्या पिढीच्या योगदानाची दखल घेण्यात आलय. 'रियलिटी जेन नेक्सट' या कॉफी टेबल बुकमध्ये रिअल इस्टेट व्यवसायातल्या बारा दिग्गजांचा समावेश करण्यात आलाय. या बारा जणांमध्ये पुढिल तीस वर्षात व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता आहे. शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चद्रांच्या हस्ते कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आली. यावेळी एस्सेल ग्रुपचे पुनीत गोयंका आणि अमित गोयंका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणा-या युवा बिल्डरांचा डीएनकडून सत्कार करण्यात आला. डीएनएच्या या उपक्रमाचं नव्या पिढीकडून स्वागत करण्यात आलं.  डीएनएच्या कॉफी टेबल बुक प्रकाशनाच्या वेळी रिअल इस्टेमधल्या व्यावसायिकांसह राज्य सरकारमधील दिग्गजही उपस्थित होते. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="138386"]