अकोला : अकोला किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. अखेर काल रात्री उशिरा त्याला अकोला पोलिसांच्या हाती लागलाय.
आज शिवाजी कोळीला कोर्टात हजर करण्यात आलंय. अकोल्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीसाठी आपल्या किडन्या स्वस्तात विकल्याचं पुढे आलंय.
पैशाच्या निकड असणाऱ्या शेतकऱ्यांना गळाला लावून त्यांना श्रीलंकेत घेऊन जाणं, आणि किडण्या काढण्याच्या सगळ्या कारवाईत शिवाजी कोळीची प्रमुख भूमिका असल्याचं बोललं जातयं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.