नागपूर : बरोबर वर्षभरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या विधीमंडळाच्या इमारतीत आजपासून अधिवेशनाला सुरूवात होतेय. दुष्काळ, नापीकी आणि महागाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलीय.
आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाआधी सरकराला घेरण्यासाठी विरोधकांच्या हाती किती मुद्दे आहे याची छोटीशी झलक आघाडीच्या पत्रकारपरिषदेत दिसली....डाळा घोटाळ्यापासून तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपर्यंत साऱ्याच मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सरकारला झोडपून काढलंय.
तिकडे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरही विरोधकांनी बहिष्कार घातला. पण मुख्यंत्र्यांचं निमंत्रण घेऊन स्वतः गिरीश बापट विरोधकांच्या भेटीला पोहचले. पण त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार डाळीचे भाव आणि शिवसेनेची भूमिका यामुद्द्यांवरून सरकारवर जोरदार बरसले होते. सरकारच्या बाजूनं मुख्यमंत्री आणि गिरीश बापट किल्ला लढवण्याचं काम करतील...पण त्यांना शिवसेनेची किती साथ मिळतेय,..कोण कोणावर वरचढ ठरतयं याचा फैसला होईल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.