एका क्लिकसरशी खात्री करा तुमच्या ब्रँडेड वस्तूंची!

भारतातीलचं नव्हे तर जगातील ग्राहकांसाठी एक खूश खबर आहे... बाजारातून खरेदी करणारी कोणतीही वस्तू खरी आहे की खोटी? याची खात्री आता ग्राहक राजाला वस्तू खरेदी करण्यापूर्वी करता येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 6, 2014, 01:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
भारतातीलचं नव्हे तर जगातील ग्राहकांसाठी एक खूश खबर आहे... बाजारातून खरेदी करणारी कोणतीही वस्तू खरी आहे की खोटी? याची खात्री आता ग्राहक राजाला वस्तू खरेदी करण्यापूर्वी करता येणार आहे. त्यामुळे फसवणुकीपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या अमित पाटेंनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय.
जळगावातल्या चाळीसगावमध्ये राहणाऱ्या अमिट पाटे यांच्या संशोधनाची जगाने दखल घेतलीय. आमित पाटे याने जगातल्या ब्रँडेड वस्तू खऱ्या आहेत की खोट्या? याची माहिती देणाऱ्या तंत्राचा शोध लावलाय. यामुळे आता केवळ एका क्लिकवर ग्राहकांना ब्रँडेड वस्तूंची पारख करता येणार आहे. यासाठी अमितनं एक टॅग तयार केलाय. त्यावर खरेदी केलेल्या मालाची माहिती टाकल्यास खरेदी केलेली वस्तू खरी आहे की खोटी? याची माहिती मिळणार आहे. साध्या आणि अँड्रॉईड मोबाईलवरूनही अशी माहिती मिळवता येणं ग्राहकांना शक्य होणार आहे, असं अमितनं म्हटलंय.
अमितची बहिण स्वीटी पाटे हिनं नासामध्ये संशोधन करून नावलौकिक मिळवलं होतं. त्याचप्रमाणे अमितनंही संशोधन करून नाव कमावल्यानं आई-वडिलांना आनंदाश्रू आवरता येणं कठिण झालंय.
ब्रिटनमधल्या ‘युनायटेड किंग्डम ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट’ विभागाकडून घेण्यात आलेल्या जागतिक स्टार्ट अप संशोधन स्पर्धेत अमित पाटे यांच्या संशोधनाला प्रथम पारितोषक मिळालंय. जगातील ३० हून अधिक देशांतील १६० स्पर्धकांना मागे टाकत अमितच्या चमूनं हे यश संपादन केलंय. अमित पाटे या संशोधनाचं पेटंट मिळवणार असून ‘टाय-अप’नुसार कंपन्यांना टॅग देण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.