बलात्काराला घाबरून ‘ती’नं घेतलं जाळून!

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं भेदरलेल्या मुलीनं जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 4, 2013, 03:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं भेदरलेल्या मुलीनं जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
रावेर तालुक्यातील धोदे गावात ही घटना घडलीय. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकतर्फी प्रेमातून ही घटना घडलीय. गावातच राहणाऱ्या जितेंद्र कोळी याचं या मुलीवर एकतर्फी प्रेम असल्याचं समजतंय. परंतू संबंधित मुलीनं दाद न दिल्यानं जितेंद्रनं मुलीची छेडछाड काढली. त्यामुळे भेदरलेल्या या मुलीनं समाजात आपली बदनानी होईल, अशी धास्ती घेतली. याच भीतीनं मुलीनं स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं.

भाजलेल्या अवस्थेत तिला रावेरच्या ग्रामीण हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं परंतू तिथं तिच्यावर उपचारासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे तिला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. ही मुलगी जवळजवळ ७५ ते ८० टक्के भाजलीय. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी जितेंद्र कोळी याला पोलिसांनी अटक केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.