www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
दिवाळी जसजशी जवळ येतेय तशी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि नव्या कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. मात्र, या दिवाळीनिमित्ताने अनेक बनावट पदार्थ बाजारात आले आहेत. त्यापासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे. नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. मिठाई, दुध याची भेसळ अनेक ठिकाणी दिसत आहे. आता तर अॅसिडयुक्त काजू बाजारात आले आहेत. त्यामुळे काजू घेताना सावधगिरी बाळगा.
मुंबईत एरवीही गजबजणा-या दादरच्या बाजारात सध्या तर गर्दीचा महापूर लोटलेला दिसतोय. रस्त्याच्या कडेला बसणा-या फेरीवाल्यांपासून ते मोठमोठी दुकानं, मॉल्समध्ये खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. मात्र, नागपूरमध्ये धोकादायक बाब पुढे आले आहे. काजूचं आयुष्य वाढावं आणि त्याची चकाकी वाढाली यासाठी अॅसिडमधून काजू धुतले जात आहेत.
दिवाळीच्या तोंडावर अशा घटनांमध्ये वाढ होते. आरोग्याला हे अपायकारक आहे. असे अॅसिड लावलेले काजू कसे ओळखावेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहाजीक आहे. झी मीडिया तुमच्यासाठी घेऊन आलाय अशी भेसळ ओळखणारी सोपी पद्धत. घरच्या घरी आपण काजू अॅसिडने धुतले (हायड्रोजनयुक्त असा भाजून भोके पाडणारा पदार्थ) आहेत का हे ओळखू शकता.
प्रथम काजूवर पाणी टाकावे. त्यानंतर लिटमस कागदाचा वापर करावा. पाणी ओतलेल्या काजूवर हा लिटमस कागद ठेवल्यानंतर तो कागद लाल झाला तर समजावे की काजू हे अॅसिडने धुतलेले आहेत. किंवा अन्य रासायनिक प्रक्रियेतून काढलेले आहेत. त्यामुळे काजूची प्रथम खातरजमा करून घ्या. नाहीतर आपल्या आरोग्याला नक्कीच अपाय होईल, बरं का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.