काही नवरे बाशिंग बांधून थकले!- फडणवीसांचा पवारांवर पलटवार

`काही नवरे बाशिंग बांधून थकलेत`, असा पलटवार करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 22, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`काही नवरे बाशिंग बांधून थकलेत`, असा पलटवार करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.
`काही नवरे बाशिंग बांधून थकलेत. त्यामुळं दुसऱ्यांचं लग्न होत आहे हे त्यांना सहन होत नाही`, अशी उपरोधिक टीका फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर केली. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन ही प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना `उतावळा नवरा` म्हणत टोला लगावला होता.

आधी राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला त्यानंतर शनिवारी एका कार्यक्रमात शरद पवार यांनीही मोदींची `उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग` अशी खिल्ली उडवून जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष जनतेला संघटीत होण्याचं आवाहन केलं होतं. पवारांची हीच टिका भाजपाला झोंबली असून देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय.
लोकसभा निवडणुकांना अजून बराच अवकाश असताना आतापासूनच पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच लागली आहे. त्यात भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानं पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा असणारे सगळेच नेते सक्रीय झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ